Nashik's daughter came from Paris, Netherlands | पॅरिस, नेदरलँडमधून आल्या नाशिकच्या कन्या
पॅरिस, नेदरलँडमधून आल्या नाशिकच्या कन्या

सिडको : मतदान हे पवित्र कर्तव्य तर आहेच, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. याचाच विचार करून सध्या पॅरिसमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. श्रृती कपाडिया या नााशिकमध्ये आल्या आणि त्यांनी सोमवारी (दि.२१) नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदानदेखील केले.
डॉ. कपाडिया पॅरिस येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्यांनी खास सुटी घेतली आहे. त्या सर्व प्रथमच पॅरिसहून पुणे येथे आल्या व रविवारी (दि.२०) दुपारी नाशिकमध्ये दाखल झाल्या. डॉ. श्रृती यांचे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. पदवीचे शिक्षण बंगळुरूमध्ये झाले आहे. खुटवडनगरला त्यांचे आई-वडील वास्तव्यास आहेत. डॉ. श्रृती यांनी सकाळी कामटवाडे येथील धन्वंतरी महाविद्यालयात मतदान केले.
देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनीच मतदान करणे गरजेचे आहे. आपण आज मतदान केले नाही तर पुढील पिढीला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. तसेच, आपण जागरूकतेने मतदान केल्यास पुढील पिढीदेखील मतदान करण्यासाठी नेहमी प्रवृत्त होईल. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी हा आपले प्रतिनिधित्व करतो. देश बदलण्याची ताकद आपल्या एका मतामध्ये आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
विदेशात नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या नाशिककरांनीही लोकशाहीच्या या उत्सवात हिरिरीने सहभाग नोंदवला. नाशिकची कन्या असलेली पूनम लखीप्रसाद पारिक यांनी नेदरलॅँडमधील एन्डोवन या शहरातून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. पूनम पारिक या नेदरलँडमध्ये एएसएमएल कंपनीमध्ये फायनॅशिएल अ‍ॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. भारतीय लोकशाहीच्या मजबुती करणासाठी आपण नाशिकला आल्याचे पारिक यांनी यावेळी सांगितले.


Web Title:  Nashik's daughter came from Paris, Netherlands
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.