नासिकचा सराफ बाजार आता मंगळवारीही सुरू राहाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 16:41 IST2021-03-10T16:39:47+5:302021-03-10T16:41:42+5:30

नाशिक-  शहरात वाढणाऱ्या कोवीड रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने लावण्यात आलेल्या कोवीड नियमावलीला दि नासिक सराफ असोसिएशनने शंभर टक्के प्रतीसाद देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दर मंगळवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करून सोमवार ते शुक्रवार असे सलग पाच दिवस प्रशासनाने नमूद केलेल्या वेळेत नासिक सराफ बाजार सुरू राहणार आहे. 

Nashik's bullion market will now continue on Tuesday | नासिकचा सराफ बाजार आता मंगळवारीही सुरू राहाणार

नासिकचा सराफ बाजार आता मंगळवारीही सुरू राहाणार

ठळक मुद्देकोरोनामुळे निर्णयग्राहकांच्या सेायीचा विचार

नाशिक शहरात वाढणाऱ्या कोवीड रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने लावण्यात आलेल्या कोवीड नियमावलीला दि नासिक सराफ असोसिएशनने शंभर टक्के प्रतीसाद देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दर मंगळवारची साप्ताहिक सुट्टी रद्द करून सोमवार ते शुक्रवार असे सलग पाच दिवस प्रशासनाने नमूद केलेल्या वेळेत नासिक सराफ बाजार सुरू राहणार आहे. 

शहरात कोरोना संसर्ग वाढु लागल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या सोमवारी (दि.८)  अनेक निर्बंध जारी केले असून सायंकाळी सात वाजेनंतर दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. नव्या नियमावलीत शनिवार व रविवार दिवसभर व्यावसायीक आस्थापणे बंद ठेवण्याचा नियम स्थानिक प्रशासनाने केला आहे. त्यातच मंगळवारची साप्ताहिक सुटी अश्या परिस्थितीत अठवड्यातील तिन दिवस बाजार बंद राहिल्यास एकीकडे व्यावसायीकांना याचा आर्थिक फटका बसू शकतो तर दुसरीकडे ग्राहकांचीही ऐन लग्नसराईत सोने खरेदीसाठी गैरसोय होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मंगळवारीही सराफ बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय नासिक सराफ असोसिएशनने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहूल थोरात यांनी दिली आहे.

Web Title: Nashik's bullion market will now continue on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.