शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटातही फुलली नाशिकची शेती- हिरव्या सोन्याने दिली अर्थचक्राला गती

By नामदेव भोर | Updated: June 21, 2020 17:47 IST

नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटातही शेतात राबला बळीराजा नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे शहरांना भाजीपाला पुरवठा

नामदेव भोर / नाशिक : कोरोना संकटात अनेक व्यवसाय, आस्थापना, उद्योग जिल्ह्यात बंद असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असलेली शेतीनाशिक जिलह्यात दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही फुलली असून कोरोना काळातील टाळेबंदीमुळे मंदावलेल्या अर्थचक्राला जिल्ह्यातील शेतीमुळेच  गती मिळाल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले. जिल्ह्यात ज्या काळात लॉकडाऊन होते त्याकाळातही जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात राबत होता. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके सहज उपलब्धतेचा दरवर्षीप्रमाणेच प्रश्न असताना लॉकडाऊन काळातील गैरसोयींचा सामना करून जिल्ह्यातील बळीराजाने आपली शेतील फुलवली. दरम्यान,  जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रे या  कालावधीत सुरू असल्याने बळीराजाला काही प्रमाणात  दिलासा मिळाल्याचे दिसून आले. मात्र वाहतुकीसाटी साधणे तसेच आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे घरीच राखून ठेवलेले सोयाबीनचे बियाने वापरून खरीपाच्या पेरणीही सुरू केली आहे. 

असा पुरविला भाजीपाला आणि फळेलॉकडाऊन काळात सर्व काही लॉक असतांना शेतकऱ्यांनी थेट विक्री  करून नागरिकांची ताज्या भाजीपाल्याची गरज पूर्ण केली. जिल्ह्यातील २७३ गट, १७ शेतकरी उत्पादक कंपनी व ६ हजार ३४० शेतकऱ्यांमार्फत नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे व या मोठ्या शहरांना दररोज १२५ ते १५० मेट्रीक  टन भाजीपाला, फळे पुरविण्यात आला. लॉकडाऊन कालावधीत १५ हजार ६३२ मे. टन फळे आणि भाजीपालाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरवठा केला. तर लॉकडाऊन काळात पाचोरा तालुक्यातील १६० टन मोसंबी व ४ टन पेरुची नाशिक जिल्ह्यात विक्री करण्यात आली. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीvegetableभाज्या