नाशकात तारण मिळकतीवर साठेखत करून पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 17:25 IST2018-01-12T17:19:17+5:302018-01-12T17:25:09+5:30
नाशिक : रविवार कारंजावरील पंजाब नॅशनल बँकेकडे तारण ठेवलेल्या बंगल्याच्या उताºयांवरून साठेखत करून तिघा संशयितांनी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशकात तारण मिळकतीवर साठेखत करून पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक
नाशिक : रविवार कारंजावरील पंजाब नॅशनल बँकेकडे तारण ठेवलेल्या बंगल्याच्या उता-यांवरून साठेखत करून तिघा संशयितांनी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी कृष्णकुमार नाथुलाल गुप्ता यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित केशव लक्ष्मण पगार यांच्या नावे असलेला म्हसरूळ गाव शिवारातील वरद आशुराज हा बंगला व शरदचंद्र पवार कृषी मार्केटमधील २९ नंबरचा १००० स्क्वेअर फूट गाळा हा पंजाब नॅशनल बँकेकडे तारण दिलेला होता़
या मिळकतीचे मूळ खरेदीखत बँकेकडे जमा असताना बँकेची एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक व्हावी व बँकेचे कर्ज बुडवावे यासाठी संशयित केशव पगार यांनी मित्र संशयित लक्ष्मण गुलाबराव गावडे व छोटेसिंग बाबुलाल गिरासे यांना या मिळकतीचे सातबारा उतारे पंधरा लाख रुपये बँकेचे कर्ज बोजा आहे हे माहिती असतांनाही ५ एप्रिल २०१७ रोजी निबंधक कार्यालय ५ मध्ये साठेखत करारनामा केला़
यामुळे बँकेची फसवणूक होऊ शकते याची जाणीव असतानाही या तिघा संशयितांनी हा साठेखत करारनामा करून बँकेची फसवणूक केल्याचे गुप्ता यांनी फिर्यादीत म्हटले आहे़