जिल्हा परिषदेचा ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:28 IST2018-08-01T20:25:14+5:302018-08-01T20:28:10+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेचा ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी केला आहे.
नाशिक जिल्ह्याने घरकुल कामांमध्ये मोठी झेप घेतली असून चार महिन्यांपूर्वी घरकुल योजनेत देशात २२५ व्या क्रमांकावर असलेला नाशिक जिल्हा आता ४० व्या क्रमांकावर आला आहे. तर राज्यात पल्यिा क्रमांकावर आहे. जिल्ह्यात घरकुल बांधकामाची प्रगती पाहाता यापेक्षा अधिक घरकुलांची कामे होऊ शकतात याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा परिषदेने एकुण ३० हजार घरकुलांचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरु असून या योजनेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्र मांकावर आहे. जिल्ह्यात घरकुल बांधकामाची प्रगती पाहता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी अतिरिक्त ३० हजार घरकुलांचे उदिष्ट जिल्ह्यास उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्याकरिता सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेसाठी एकूण २९,०८२ घरकुलांचे उदिष्ट मिळाले आहे. त्यापैकी २०१६-१७, २०१७-१८ या वर्षातील२३६१० उद्दिष्टापैकी २०७८८ (८८ टक्के) घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्विरत २८२२ घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. सन २०१८-१९ मधील ५४४३ घरकुल कामांपैकी ९३ कामे पूर्ण झाली असून आॅगस्ट अखेर सर्व उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार डॉ. गिते यांनी केला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शितल सांगळे तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांनीही अनुकुलता दर्शविली असून त्यांच्या सहकार्याने सदरचे उदिष्ट येत्या तीन मिहन्यात पूर्ण करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचेही गिते यांनी सांगितले.
घरकुल योजनेबाबत वेळोवेळी आढावा बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात येत आहे. गट विकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या बैठकीत सर्वांनी अतिरिक्त उदिष्ट पूर्ण करण्याची तयारी दर्शविल्याने ३० हजार अतिरिक्त उदिष्टाची मागणी करण्यात आली आहे. यासाठी ४५० ोटी रु पयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे अतिरिक्त मागणी केल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी दिली.