nashik,pink,saree,and,fetish,dress,in,women's,polling,booth | महिला मतदान केंद्रात गुलाबी साडी आणि फेट्याचा रूबाब

महिला मतदान केंद्रात गुलाबी साडी आणि फेट्याचा रूबाब

ठळक मुद्देसखी केंद्र: मतदान कर्मचारी महिलांनी सजविले केंद्र

नाशिक: जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये एक याप्रमाणे असलेल्या १५ सखी केंद्रांवर महिला मतदान कर्मचाऱ्यांनी महिला सक्षमतेचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाने मतदान केंद्रे सजविली होती. विशेष म्हणजे सखी केंद्रात नियुक्त महिला कर्मचाऱ्यांनी गुलाबी रंगाच्या साड्या आणि फेटे परिधान करून सखी केंद्राचे वेगळेपण अधोरेखील केले.
जिल्ह्यात नांदगाव- जिल्हा परिषद शाळा, साकोरा, मालेगाव (मध्य)- आरमा प्राथमिक शाळा, खोली नं.३, नवापूरा वॉर्ड, मालेगाव (बाह्य)- पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प,बागलाण- जिजामाता गर्ल्स हायस्कूल ज्यु. कॉलेज, सटाणा, कळवण- झेड.पी. सेमी इंग्लिश स्कूल, कळवण बुदू्रक., चांदवड-झेड.पी. उर्दू प्रायमरी स्कूल, चांदवड, येवला- जनता विद्यालय, विंचूररोड, येवला, सिन्नर- चांडक कन्या विद्यालय, सिन्नर, निफाड- वैनतेय विद्यालय ज्यू. कॉलेज, निफाड, दिंडोरी- व्ही. एन. नाईक कॉलेज, दिंडोरी, नाशिक (पूर्व)- पुणे विद्यार्थिगृह अभियांत्रिकी कॉलेज, म्हसरूळ, नाशिक (मध्य)- महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, गंगापूररोड., नाशिक (पश्चिम)- नवजीवन विद्यालय, शिवशक्ती चौक, सिडको, देवळाली- देवळाली हायस्कूल, धोंडीरोड, कॅन्टोन्मेंट , इगतपुरी- झेड. पी. प्रायमरी स्कूल, टिटोली, इगतपुरी या ठिंकाणी सखी केंद्रे होती.
यामधील बहुतेक सर्वच केंद्रांवरील महिला मतदान कर्मचाºयांनी या विशेष मतदान केंद्राची सजावट करण्यात आली होती. ही सर्व केंद्रे सुस्थितीतील इमारतींमध्ये असल्यामुले सजावटीला कोणतीही अडचण आली नाही. सिडको, बागलाण, दिंडोरी, निफाड, कॅम्प येथील सखी मतदा केंद्रांवरील महिला अधिकारी, कर्मचारी गुलाबी रंगाची साडी आणि गुलाबी फेटे परिधान करून मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते.

Web Title: nashik,pink,saree,and,fetish,dress,in,women's,polling,booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.