अमेरिकेतील रॅम स्पर्धेत नाशिकचे भारत पन्नू होणार सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:22 IST2019-05-06T19:21:00+5:302019-05-06T19:22:20+5:30
नाशिक : नाशिकस्थित लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे अमेरिकेतील प्रतिष्ठित रॅम २०१९ (रेस क्रॉस अमेरिका) या स्पर्धेत सहभागी होणार ...

अमेरिकेतील रॅम स्पर्धेत नाशिकचे भारत पन्नू होणार सहभागी
नाशिक: नाशिकस्थित लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे अमेरिकेतील प्रतिष्ठित रॅम २०१९ (रेस क्रॉस अमेरिका) या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सलग बारा दिवस म्हणजे २८८ तास सायकलचा प्रवास असून, या स्पर्धेसाठी ते रवाना होत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जगातील सर्वात अवघड मानली जाणारी ही स्पर्धा अमेरिकेत येत्या ११ जून रोजी सुरूहोत आहे. अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंतचा पाच हजार किलोमीटरचा प्रवास ठरलेल्या वेळेत स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जगभरातून स्पर्धक सहभागी होत असतात. नाशिक शहरात सर्वात आधी २०१५ साली डॉ. महाजन बंधू हे रॅम स्पर्धा पूर्ण करणारे भारतीय ठरले आहेत. त्यानंतर लष्करातच नाशिकमध्ये रुजू असलेले श्रीनिवास गोकुळनाथ यांनी एकट्याने ही स्पर्धा पूर्ण करीत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.
यापाठोपाठ भारत पन्नू यांनीही ही स्पर्धा पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे भारतीय आर्मीमध्ये जून २००५ पासून अॅरोनॉटीक्स इंजिनिअर आहेत. ते आर्मीच्या हेलिकॉप्टर देखभालीची कामे बघतात. नाशिक कॅम्पसमध्ये सप्टेंबर २१०६ पासून रुजू असल्याचे प्रवीण खाबिया, डॉ. मनीषा रौंदळ यांनी सांगितले.