शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

ओझरखेडला मायलेकाचा गळा चिरून निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडीतील मायलेकाची त्याच्या झोपडीत गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़०४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ सविता गोटीराम साहळे (३५) व करण गोटीराम साहळे (११, दोघेही मूळ राहणार, मोळंगी कादवा, ता़दिंडोरी,जि़नाशिक) असे खून करण्यात आलेल्या मायलेकाची नावे आहेत़ ग्रामीण पोलिसांकडून मारेकºयाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळील कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडीतील मायलेकाची त्याच्या झोपडीत गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़०४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ सविता गोटीराम साहळे (३५) व करण गोटीराम साहळे (११, दोघेही मूळ राहणार, मोळंगी कादवा, ता़दिंडोरी,जि़नाशिक) असे खून करण्यात आलेल्या मायलेकाची नावे आहेत़ ग्रामीण पोलिसांकडून मारेकºयाचा शोध सुरू असून या दोघांच्या खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही़ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णगाव शिवारातील शेळकेवाडी येथे सविता साहळे व तिचा मुलगा करण हे दोघेच एका झोपडीवजा घरात राहत असून पती गोटीराम साहळे यांचा सुमारे पाच वर्षांपुर्वी मृत्यू झाला आहे़ पतीच्या मृत्युनंतर सविता ही आई-वडीलांकडेच राहत होती़ रात्री साडेअकरा बारा वाजेच्या सुमारास या दोघा मायलेकांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आले़ मयत सविता साहळे यांची एक आत्या व भाऊ हे देखील घरापासून जवळच राहत असून त्यांनाही या घटनेची माहिती नव्हती़दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचााºयांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केल्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले़ या घटनेमुळे ओझरखेडसह दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून मयत सविताच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू आहे़ दरम्यान, पोलीस संशयितांचा शोध घेत असून या मायलेकाची हत्त्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, शेतजमिनीचा वा आणखी काही वाद होता का या कारणांचा शोध घेतला जातो आहे़ या प्रकरणी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़--कोट--३१ जुलैला कल्याणला गाडीत माल भरून घेऊन गेलो होते़ तत्पुर्वी या दोघांना बाजारहाटासाठी पैसेही देऊन गेलो होतो़ मात्र चार दिवस गाडी खाली न झाल्यामुळे कल्याणलाच रहावे लागले़ त्यात, शुक्रवारी रात्री फोन आला व नाशिकला आल्यानंतर या दोघांचाही खून झाल्याची माहिती मिळाली़- लहानू बोरस्ते, मयत सविताचा भाऊ़