संपाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 19:34 IST2019-09-06T19:33:45+5:302019-09-06T19:34:47+5:30
नाशिक : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसºया दिवशी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयातील कामकाज ठप्प झाले आहे. महसूल कर्मचारी ...

संपाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
नाशिक : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसºया दिवशी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयातील कामकाज ठप्प झाले आहे. महसूल कर्मचारी संघटनेने गुरुवारपासून सुरू केलेल्या या आंदोलनात जवळपास ९०० पेक्षा अधिक कर्र्मचारी सहभागी असल्याने दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, सकाळी कर्मचाऱ्यांनी संघटना कार्यालयाच्या परिसरात जोरदार निदर्शने केली.
महसूल कर्मचाºयांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये शासनाने तत्त्वत: काही मागण्या मान्य केलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात या मागण्यांबाबत कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नसल्याने गेल्या सहा वर्षांपासून कर्मचारी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. वेळोवेळी यासंदर्भात चर्चा होऊनदेखील शासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने महसूल कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनात जिल्ह्यातील ३३१ लिपिक, २१७ अव्वल कारकून, लिपिक संर्वातून म.अ. संवर्गातील १७, वाहनचालक ३५, शिपाई १७२ तसेच नायब तहसीलदार ४३ असे ८१५, तर विभागीय आयुक्त कार्यालयातील १०६ महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत.
आपल्या मागण्यांसाठी अनेक टप्प्यात विविध प्रकारची आंदालने करण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत दुपारच्या सुटीत द्वारसभा, घंटानाद, काळ्या फिती लावून कामकाज करणे तसेच दुपारच्या सुटीत निदर्शने करणे, क्रांतिदिनी सकाळी एक तास जास्तीचे कामकाज करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही या आंदोलनातून करण्यात आला. एक दिवसाची सामूहिक रजा टाकून आंदोलन करण्यात येऊनही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे कर्मचारी थेट संपावर गेले आहेत.