विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:14 IST2018-08-08T16:08:21+5:302018-08-08T16:14:46+5:30

नाशिक : महाविद्यालयात पायी जात असलेल्या विद्यार्थिनीस रस्त्यात अडवून तिचा हात धरून विवाहाची गळ घालून विवाह न केल्यास पळवून नेण्याची तसेच बदनामीची धमकी देत विनयभंग करणा-या रोडरोमिओस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ चेतन श्यामराव आमरे (२३, रा. जोशीवाडा, नाग चौक, पंचवटी) असे अटक केलेल्या रोडरोमिओचे नाव आहे़

nashik,minor,girl,molesting,Roadrmio,arrested | विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

ठळक मुद्दे रस्त्यात अडवून विनयभंग ; पोक्सो अन्वये गुन्हा दाखल

नाशिक : महाविद्यालयात पायी जात असलेल्या विद्यार्थिनीस रस्त्यात अडवून तिचा हात धरून विवाहाची गळ घालून विवाह न केल्यास पळवून नेण्याची तसेच बदनामीची धमकी देत विनयभंग करणा-या रोडरोमिओस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ चेतन श्यामराव आमरे (२३, रा. जोशीवाडा, नाग चौक, पंचवटी) असे अटक केलेल्या रोडरोमिओचे नाव आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि़४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनी पंचवटीतील काट्या मारुती मंदिराजवळील हत्ती पुलाजवळून पायी जात होती. यावेळी संशयित चेतन आमरे याने या मुलीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडविले़ यानंतर या मुलीचा हात धरून विवाहाची मागणी घातली तसेच विवाह न केल्यास पळवून नेण्याची तसेच महाविद्यालयात बदनामी करण्याची धमकी देत विनयभंग केला़

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो)अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

Web Title: nashik,minor,girl,molesting,Roadrmio,arrested