नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:02 IST2018-08-08T16:02:27+5:302018-08-08T16:02:41+5:30
नाशिक : नेपाळी तरुणाने घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीकडे पैशांची मागणी करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़७) दुपारच्या सुमारास चांडक सर्कल परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित रमेश अशोब बिस्ट (२३, रा़ महेंद्रनगर, नेपाळ) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे़

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न
नाशिक : नेपाळी तरुणाने घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीकडे पैशांची मागणी करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़७) दुपारच्या सुमारास चांडक सर्कल परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित रमेश अशोब बिस्ट (२३, रा़ महेंद्रनगर, नेपाळ) या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे़
चांडक सर्कलजवळील एका सोसायटीत दुपारी पावणेदोेन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी लहान भावासोबत घरात एकटीच होती़ यावेळी संशयित रमेश बिस्ट हा घरी आला व वीस रुपयांची मागणी केली़ यावर या मुलीने वडील घरी नसल्याचे सांगितले असता पैसे नसतील तर माझ्यासोबत चल असे म्हणून फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला़ हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी रमेश बिस्ट यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़
दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़