nashik,manisha,bagul,honored,national,impressive,female,awards | मनीषा बागुल राष्ट्रीय प्रभावशाली महिला पुरस्कराने सन्मानित
मनीषा बागुल राष्ट्रीय प्रभावशाली महिला पुरस्कराने सन्मानित

नाशिक: ब्रीजभूमी फाऊंडेशन नवी दिल्ली या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा राष्टÑीय प्रभावशाली महिला पुरस्कार नाशिकच्या मनिषा बागुल यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
गेल्या शुक्रवारी नवी दिल्ली येथे ब्रिजभूमी फौंडेशन या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या भारतातील ५१ प्रभावशाली महिलांचा प्रभावशाली महिला म्हणून गौरव करण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासून मनीषा बागुल या आंतरराष्ट्रीय ज्युरी, तसेच वृद्धाश्रम सहायता, अवयवदान जनजागृती अशा विविध विषयांवर उल्लेखनीय काम करीत आहेत. या समारंभात ब्रिजभूमी फौंडेशनच्या संस्थापक अश्वनी चौधरी, अध्यक्षा ऋचा मेहता यांच्या हस्ते हा पुरस्कार बागुल यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्र मात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.
विविध व्यावसायिक, सामाजिक आणि सेवाभावी संस्थांमधील कार्याची दखल घेऊन भारतातील विविध महिलांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. गेल्या वर्षभरातील कामगिरी आणि उपक्रमाचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. तीन पातळीवर स्क्रीनिंग होऊन अंतिम पुरस्कार्थींची निवड केली जाते. त्यामध्ये नाशिकच्या मनिषा बागुल या एकमेव होत्या. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Web Title: nashik,manisha,bagul,honored,national,impressive,female,awards
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.