शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी व्याजाच्या तगाद्याने उपनगरमध्ये एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:31 IST

नाशिक : तीन लाख रुपयांचे पाच वर्षात झालेले व्याजाचे पैसे वसुलीसाठी सुरू असलेला तगादा तसेच शारीरिक व मानसिक छळास कंटाळून उपनगरमधील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली़ सुनील श्रावण सूर्यवंशी (वय ५३, रा. पूजा रेसिडेन्सी, ई विंग, आनंदनगर, उपनगर, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी पंचवटी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देशहरात अवैध सावकारी : शारीरिक व मानसिक छळआत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

नाशिक : तीन लाख रुपयांचे पाच वर्षात झालेले व्याजाचे पैसे वसुलीसाठी सुरू असलेला तगादा तसेच शारीरिक व मानसिक छळास कंटाळून उपनगरमधील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली़ सुनील श्रावण सूर्यवंशी (वय ५३, रा. पूजा रेसिडेन्सी, ई विंग, आनंदनगर, उपनगर, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी पंचवटी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

संस्कृती सुर्यवंशी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील सुनील यांनी संशयित अधिकार मुरलीधर सूर्यवंशी (रा़ पंचवटी) व कल्पनाबाई खरे (पूर्ण नाव नाही, रा़म्हसरूळ) या दोघांकडून २०१३ मध्ये तीन लाख रुपये शेकडा दहा रुपये व्याजाने घेतले होते़ या रकमेचे पाच वर्षांत या रकमेचे झालेले अवाच्चे सव्वा रुपये वसुल करण्यासाठी चौधरी व खरे हे वाईट-साईट शिवीगाळ तसेच दमदाटी करून मारहाणही करीत होते़

या सततच्या त्रासाला कंटाळून वडील सुनील सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याचे व त्यांना संबंधितांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे़या प्रकरणी उपनगर पोलिसांनी सुनील सूर्यवंशी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौधरी व खरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़शहरात अवैध सावकारीया प्रकरणामुळे शहरातील अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे़ पैशामुळे अडलेल्यांना नागरिकांची निकड लक्षात घेऊन त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे द्यायचे़ यानंतर वसुलीसाठी तगादा लावायचा, प्रसंगी मारहाणही करायची असे प्रकार सुरू आहेत़ कर्जाने पैसे वाटणाºयांकडे सावकारीचा परवाना आहे का याचा पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे़

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस