शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नाशिककरांचा भ्रमनिरास, करवाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 1:35 AM

गेल्या वर्षी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर वाढल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी त्यांच्यानंतर आलेल्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांची करवाढ कायम ठेवली आहे. महासभेचा ठराव आणि त्यानंतर सातत्याने येत असलेला दबाव यामुळे आयुक्तांनी शेती क्षेत्रावरील कर आकारणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देशेतीवरील आकारणीला स्थगिती : सामासिक अंतरात सूट, बाकी ‘जैसे थे’

नाशिक : गेल्या वर्षी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर वाढल्यानंतर निर्माण झालेल्या असंतोषानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी त्यांच्यानंतर आलेल्या आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांची करवाढ कायम ठेवली आहे. महासभेचा ठराव आणि त्यानंतर सातत्याने येत असलेला दबाव यामुळे आयुक्तांनी शेती क्षेत्रावरील कर आकारणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र ती रद्द न केल्याने टांगती तलवार कायम आहे, तर सामासिक अंतरासाठी लागू केलेला कर आणि बिल्टअप क्षेत्रावर कर आकारणीचा निर्णय वगळता करवाढ कायम ठेवण्यात आल्याने बहुप्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे.डिसेंबर महिन्यापासून रुजू झाल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यावर करवाढ रद्द करण्याचा दबाब होता. त्यांनी अभ्यास करून निर्णय घेऊ असे दोन महिन्यांपासून ते सांगत होते. अखेरीस २० फेब्रुवारीच्या आत त्यावर निर्णय घेणे आवश्यक असल्याने गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. त्यानुसार सध्या शेती क्षेत्रावर कर आकारणी सुरू असली तरी ती स्थगित करण्यात येणार आहे. राज्यात अन्य २६ महापालिकांमध्ये मोकळ्या जागेची नक्की व्याख्या काय आहे. त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येईल आणि तोपर्यंत करवाढ स्थगित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मोकळ्या जागेबाबत विशेषत: एखादी इमारत बांधताना सोडाव्या लागणाºया सामासिक अंतराच्या मोकळ्या जागेतही आयुक्तांनी कर लागू केला होता.आता कार्पेटनुसार कर आकारणीकोणत्याही मिळकतीचे मूल्यांकन करताना यापूर्वी चटई क्षेत्र विचारात घेऊन कर आकारणी करण्यात येत होते. मात्र तुकाराम मुंढे यांनी त्यात बदल करून २०१८-१९ पासून बिल्टअप क्षेत्रावर कर आकारणीचे आदेश काढले होते. ज्या इमारतीचे बिल्टअप क्षेत्र उपलब्ध नसेल अशा इमारतीच्या चटई क्षेत्रातच्या किमान २० टक्के अधिक क्षेत्र विचारात घेऊन कर योग्य मूल्य निश्चित करण्यात यावे, असेही नमूद केले होते. मात्र राधाकृष्ण गमे यांनी पूर्वीप्रमाणेच चटई क्षेत्र विचारात कर आकारणीचे आदेश दिले आहेत.६०० फुटांपर्यंत घरपट्टीवरील दंड माफमहापालिका हद्दीत कलम २६७ अन्वये शहरात पूर्णत्वाचा दाखला (भोगवटा प्रमाणपत्र) नसलेल्या इमारतीसाठी असलेल्या शास्तीत बदल करण्यात आला असून, आयुक्तांनी काढलेल्या शुद्धीपत्रकात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.६०० चौरस फुटांपर्यंत निवासी बांधकाम असेल तर शास्तीची आकारणी केली जाणार नाही. म्हणजेच सध्या तिप्पट दर आकारणीच्या नोटिसा दिल्या होत्या त्यातून मध्यमवर्गीयांची सुटका झाली आहे.६०१ ते १००० चौरस फुटापर्यंत निवासी बांधकाम असेलतर प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने शास्ती आकारण्यात येईल म्हणजेच एक पट नियमित व अर्धा पट दंड अशी दीडपट आकारणी करण्यात येईल.१००१ चौरस फुटावरील निवासी बांधकाम असेल तर प्रतिवार्षिक मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्यात येईल. म्हणजे एकपट नियमित व दोन पट दंड याप्रमाणे असेल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर