नाशिक : शहरात दुचाकी, चारचाकी वाहने सर्रासपणे चोरी केले जात आहे. वाहनचोरी करणारी टोळी पुन्हा सक्रीय झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. टाकळीरोडवरील शंकरनगर भागातील शितल को-ऑप.हौसिंग सोसायटीच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपये किंमतीची मारुती इको कार (एम.एच१५ सीटी४१९५) अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी कारमालक प्रवीण विठ्ठल खलाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भद्रकाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.शरणपुररोडवरील कुलकर्णी उद्यानाजवळ नितीन रघुनाथ धोंडगे (२३,रा.ता.बागलाण), या युवकाने त्याची स्पेलेंडर दुचाकी उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी ती गायब केल्याची घटना घडली. याप्रकरणी नितीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हसरुळ येथील समृध्द कॉलनीमधील सिल्वर स्टार सोसायटीच्या वाहनतळात हॅन्डललॉक करुन उभी केलेली दुचाकी (एम.एच.१५बीपी ८१८८) अज्ञात चोरट्यांनी चोरी करत पोबारा केला. याप्रकरणी राहुल बबन आव्हाड (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसाार म्हसरुळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांच्या राहत्या घरापासून वाहने चोरी होत असल्याने पोलिसांच्या गस्तीविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.-----
नाशिककर सावधान....! दुचाकी, चारचाकींवर सर्रासपणे चोरट्यांकडून मारला जातोय डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 14:57 IST