शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

कन्हैयाकुमार उद्या नाशिकमध्ये; चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 8:26 PM

नाशिक : तरुणांनी आपल्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला पाहिजे, यासाठी जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार सोमवारी (दि.२०) नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहे. ‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’ या विषयावर कन्हैयाकुमार तरुणांसोबत चर्चा करणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्दे‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’ या विषयावर तरुणांसोबत चर्चा पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त

नाशिक : तरुणांनी आपल्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला पाहिजे, यासाठी जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार सोमवारी (दि.२०) नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहे. ‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’ या विषयावर कन्हैयाकुमार तरुणांसोबत चर्चा करणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेचे ५६वे व्याख्यान सोमवारी गुंफले जाणार आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्याला झालेली अटक आणि राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारसरणीमुळे कन्हैयाकुमारचे भाषण नेहमीच वादग्रस्त ठरल्याने त्याच्या भाषणांवर अनेकदा बंदीदेखील आलेली होती. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमध्ये आलेल्या कन्हैयाकुमारच्या भाषणाला तीव्र विरोध करण्यात आला होता. यंदा मात्र पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, तरुणांच्या प्रश्नांना वाचा फुटावी यासाठी कन्हैयाकुमार आपली भूमिका मांडणार असल्याचे व्याख्यानमाला आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.कन्हैयाकुमारच्या कार्यक्रमात कोणताही गदारोळ होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणचा रात्रीच ताबा घेतला जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय