ग्रामीण भागातील महिलांना मिळणार पिको-फॉल मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:15 IST2018-08-02T14:13:00+5:302018-08-02T14:15:40+5:30
नाशिक : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि स्वयंरोजगारासाठी पिको-फॉल मशीन देण्याची जिल्हा परिषदेची योजना असून समाजकल्याण विभागाकडून सदर योजना राबविण्यात येत आहे. २० टक्के सेस मधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी प्रस्ताव मागविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोसकर यांनी दिले.

ग्रामीण भागातील महिलांना मिळणार पिको-फॉल मशीन
नाशिक : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि स्वयंरोजगारासाठी पिको-फॉल मशीन देण्याची जिल्हा परिषदेची योजना असून समाजकल्याण विभागाकडून सदर योजना राबविण्यात येत आहे. २० टक्के सेस मधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी प्रस्ताव मागविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोसकर यांनी दिले.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची मासिक सभा सभापती सुनीता चारोसकर यांच्या अध्यतेखाली पार पडली. यावेळी विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला. प्रभारी समाजकल्याण अधिकारी नसल्याने सभेचे सदस्य सचिव भरत वेन्दे यांनी कामकाज पाहिजले. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजना २० टक्के जि.प. सेस अंतर्गत राबविण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी पिको-फॉल मशीन पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंरोजगारासाठी सेस अंतर्गत योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. शिवणकला अवगत असलेल्या महिलांच्या गुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी देखील सदर योजनेला प्राधान्य देण्यात आले आहे.
या योजनेबरोबरच मागासवर्गीय शेतकºयांसाठी ठिबक सिंचन योजना, पीव्हीसी पाईप तसेच बेरोजगारांच्या व्यवसायासाठी चारचाकी मालवाहतूक वाहन पुरविणे आदि योजनांवर देखील चर्चा करण्यात आली. सदर योजनांच्या लाभार्थीची निवड येत्या १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेव निवड करून दि. ३१ आॅगस्ट २०१८ पर्यंत लाभार्थ्यांना लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
तीन टक्के अपंगांच्या जिल्हा परिषद सेस योजनेंतगर्त अपंग लाभार्थ्यांनी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे १ ते ३४ योजनांपैकी लाभार्थ्यांनी दि. ३१ आॅगष्ट २०१८ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दलीत वस्ती सुधारणा योजनांतर्गत शासनाकडून नियतव्यय प्राप्त झाल्याने दलीतवस्ती सुधाणरा योजनेचे प्रस्ताव तात्काळ गटविकास अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सर्वगटविकास अधिकारी यांना दलित वस्ती सुधारणा योजनेतंर्गत पुर्ण, अपुर्ण कामांची पाहाणी करून अहवाल सादर करण्याबाबत तसेच २०१४-१५ ते २०१७-१८ पर्यंत दलित वस्ती सुधारणायोजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेली हायमास्टची स्थिती बाबतचा अहवाल ८ दिवसात सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले. दलित वस्ती सुधारणायोजनेंतर्गत अपुर्ण असलेली कामे तात्काळ पुर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
सदर समाजकल्याण समितीस सन्मानीय सदस्य हिरामण खोसकर, यशवंत शिरसाठ, सुरेश कमानकर, कन्हू गायकवाड, ज्योती जाधव, वनीता शिंदे, शोभा कडाळे आदि उपस्थित होते.