नाशिकच्या इंदिरानगरमध्ये विकृत इसमाची दहशत ; महिला भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:57 IST2018-01-01T14:51:07+5:302018-01-01T14:57:33+5:30
नाशिक : येथील परिसरात गत काही महिन्यांपासून दुपारी व सायंकाळच्या सुमारास एकट्या - दुकट्या जाणाºया महिलांसोबत दुचाकीवर येणारे दोन विकृत इसम अश्लील चाळे करून त्रास देत आहेत़ या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून यामुळे युवती व महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़ इंदिरानगर पोलीस आतापर्यंत या दोघाही विकृतांना पकडून शकले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़

नाशिकच्या इंदिरानगरमध्ये विकृत इसमाची दहशत ; महिला भयभीत
नाशिक : येथील परिसरात गत काही महिन्यांपासून दुपारी व सायंकाळच्या सुमारास एकट्या - दुकट्या जाणाºया महिलांसोबत दुचाकीवर येणारे दोन विकृत इसम अश्लील चाळे करून त्रास देत आहेत़ या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून यामुळे युवती व महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़ इंदिरानगर पोलीस आतापर्यंत या दोघाही विकृतांना पकडून शकले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़
पंधरा दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बंगल्याच्या बाहेर काही महिला गप्पा मारत होत्या़ एक विकृत इसम तिथे आला व त्याने अश्लील चाळे सुरू केल्याने महिलावर्गाने आरडाओरड केली असता त्याने तेथून पळ काढला होता़ एका नागरिकाने या विकृतास पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला़ या विकृताने पुढे विवेकानंद सभागृहासमोरील रस्त्याने जाणाºया दोन महिलांसमोर अश्लील चाळे केले व पळून गेला़
दरम्यान, या घटना ताज्या असतानाच दोन दिवसांपूर्वीच मोदकेश्वर चौकातून एक महिला पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या विकृत इसमाने त्यांच्या पाठीवर चापट मारली, अश्लिल चाळे करून पळून गेला़ या दोन विकृत इसमांच्या अश्लिल चाळ्यांमुळे परिसरातील युवती व महिलांना एकट्याने घराबाहेर पडणे भीतीदायक वाटू लागले आहे़ महिलांमधील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी तातडीने दोघा विकृत इसमांना पकडण्याची मागणी त्रस्त महिलांनी केली आहे़