शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला महिलेचे लाखाचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 15:26 IST

नाशिक : होळीची पूजा करून देवदर्शनासाठी जाणाºया महिलेच्या गळ्यातील सुमारे लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देचेतनानगर : दुचाकीवरील संशयितमंदिरात दर्शनासाठी जात असतानाची घटना

नाशिक : होळीची पूजा करून देवदर्शनासाठी जाणाºया महिलेच्या गळ्यातील सुमारे लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा मिसाळ (४०, राफ़्लॅट नंबर ४, इच्छामणी हाइट््स, कृष्णाईनगर, चेतनानगर) व त्यांचे पती कैलास यांनी सायंकाळी इमारतीमधील होळीची पूजा केली़ त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मिसाळ दाम्पत्यशेजारील तनुजा भिरुड यांच्यासोबत परिसरातील शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी निघाले़

कैलास मिसाळ हे दुचाकीवर पुढे मंदिरात गेले, तर मनीषा व तनुजा या दोघी सोनवणे मळा, एकवीरा बंगला लोट््स हाइट््स येथून पायी जात होत्या़ यावेळी समोरून सफेद रंगाच्या मोपेडवर आलेल्या दोन संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने मिसाळ यांच्या गळ्यातील एक लाख सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पाच तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले़

या घटनेनंतर मनीषा मिसाळ यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत संशयित फरार झाले होे़ याप्रकरणी मिसाळ यांच्या फिर्यादीवरून जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सोनसाखळी चोरीचा हॉटस्पॉटचेतनानगर येथील लोट््स हाइट्स परिसरातील रस्त्यावर अनेकदा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे चेन खेचून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ त्यामुळे सोनसाखळी चोरीचा हा हॉटस्पॉट बनला असून, गुरुवारीच या घटना घडत असल्याने या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाGoldसोनंPoliceपोलिसCrimeगुन्हा