सिडकोत खोदकाम करतांना आढळली मानवी हाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 20:48 IST2019-09-24T20:47:24+5:302019-09-24T20:48:36+5:30
सिडको : नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खडड्यात मानवी हाडे सापडल्याने आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ...

सिडकोत खोदकाम करतांना आढळली मानवी हाडे
सिडको : नाल्यालगत संरक्षक भिंत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खडड्यात मानवी हाडे सापडल्याने आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खुटवडनगर परिसरातील चाणक्यनगर भागातील नाल्यागलगत संरक्षक भिंत उभारण्यात येत होती. या संरक्षक भिंतीसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. शेवटचा खड्डा खोदत असतांनाच त्यामध्ये मानवी हाडे आढळली. यानंतर दिपक खुर्दळ यांनी त्वरीत घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिली. खोदकाम करतांना मानवी हाडे आढळल्याची वार्ता परिसरात समजताच नागरिकांची गर्दी झाली.
घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शांताराम शेळके, पोलिस नाईक राऊत घटनास्थळी पोहचले. मजुरांच्या सहाय्याने खड्डयात असलेले ३१ मानवी हाडे बाहेर काढण्यात आले. सदर हाडे कुजलेल्या अवस्थेत आहेत. हाडे पोलिसांनी शासकीय रु ग्णालयात तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी सदर मानवी हाडे पुरु ष जातीचे असल्याचे सांगीतले. दरम्यान, अधिक तपासासाठी मेरी येथील केमिकल अॅनालासिस कडे पाठवणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.