शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरला दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्याचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:47 IST

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रात्रीच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देभुजबळ फार्मजवळील उड्डाणपुलावरील घटना एक गंभीर जखमी; कंटेनरचालक फरार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत सटाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि़ २२) रात्रीच्या सुमारास घडली़ भूषण सुरेश सोनवणे (रा. मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ दरम्यान, या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर कंटेनर (एमएच ०४, एफक्यू ७७५६) उभा होता़ या कंटेनरचालकाने पार्किंग लाईट वा रस्त्यावर उभा असल्याची ओळख पटेल अशी कोणतीही खबरदारी घेतलेली नव्हती़ यावेळी पाथर्डी बाजूकडील उड्डाणपुलावरून दुचाकीवर (एमएच १५, एव्ही ५१३८) भूषण सुरेश सोनवणे (२४) व त्याचा सहकारी ललित दोधा सोनवणे (२२, दोघेही रा़ मीरानगर, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक) हे दोघे येत होते़

भुजबळ फार्मसमोरील उड्डाणपुलावर उभा असलेला कंटेनर लक्षात न आल्याने सोनवणे याची दुचाकी पाठीमागून या कंटेनरला जाऊन धडकली़ यामध्ये दुचाकीचालक भूषण सोनवणे हा जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला ललित सोनवणे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला आहे़ या प्रकरणी गंभीर जखमी ललित सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार कंटेनरचालकाविरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस