VIDEO : नाशिककरांना पाऊस झाला नको नकोसा, महापालिकेच्या आवारात साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 17:33 IST2017-10-12T17:07:50+5:302017-10-12T17:33:37+5:30

VIDEO : नाशिककरांना पाऊस झाला नको नकोसा, महापालिकेच्या आवारात साचले पाणी
नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणेतीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली असून महापालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपुररोडवरील राजीव गांधी भवन मुख्यालयाला पाण्याचा वेढा पडला. पालिकेच्या द्वारावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. पालिकेच्या द्वारावर हे दृश्य बघून शहरातील रहिवाशी भागात काय अवस्था असेल, याचा सहज अंदाज नाशिककर बांधत आहे. एकूणच पालिकेच्या गलथान कारभारामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. सखल परिसरासह रस्त्यांवरील चौकांमध्ये सिग्नलवरही पावसाचे पाण्याचे तळे पहावयास मिळत आहे. (व्हिडीओ - प्रशांत खरोटे)