शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 17:46 IST

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़बेलदारवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड शिक्षा सुनावली़ ७ जानेवारी २०१८ रोजी दिंडोरी रोड परिसरात नळाचे पाणी भरीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून आरोपी चव्हाण याने विनयभंग केल्याची घटना घडली होती़

ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालय : तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़बेलदारवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड शिक्षा सुनावली़ ७ जानेवारी २०१८ रोजी दिंडोरी रोड परिसरात नळाचे पाणी भरीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून आरोपी चव्हाण याने विनयभंग केल्याची घटना घडली होती़

७ जानेवारी २०१८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अकरा वर्षीय मुलगी घरात नळाचे पाणी भरीत होती़ मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून ४२ वर्षीय आरोपी राजू चव्हाण हा बळजबरीने घरात घुसला़ यानंतर या मुलीचा उचलून घेत तिचा विनयभंग केला व पळून गेला़ घडलेला प्रकार मुलीने वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला़

म्हसरूळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक सी़एस़पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून ९ एप्रिल २०१८ रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी नऊ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये पिडीत मुलगी व आरोपीस पळून जाताना पाहणारा साक्षीदार या दोघांची साक्ष महत्वाची ठरली़ न्यायालयाने आरोपी चव्हाण यास दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड, न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली़न्यायालयीन कामाकाजानंतर अवघ्या २० दिवसात निकाल७ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या अल्पवयीन मुलगी विनयभंग गुन्ह्यात ८ जानेवारीला म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक सी़एस़पाटील यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत ९ एप्रिल २०१८ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ तर ११ जूनला न्यायालयात या खटल्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या २० दिवसांत हा खटला चालवून समोर आलेल्या पुराव्यांवरून दोषी ठरवित आरोपीस शिक्षा सुनावली़अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक

अल्पवयीन मुलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दोषींना न्यायालयाने कमी कालावधीत कठोर शिक्षा दिली की समाजात एक चांगला संदेश जातो़ तसेच या घातक प्रवृत्तीला आळा बसून चुकीचे काम करणा-यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होतो़ अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे तसेच लवकरात लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे आदेश आहेत़ त्यानुसार जिल्हा न्यायालयात अल्पवयीन मुलांसंदर्भात दाखल होणारे पोस्को तसेच महिलांवरील अत्याचाराचे खटल्यांचे कामकाज जलद गतीने केले जाते़- सूर्यकात शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक़

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंगCourtन्यायालय