शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी - उमराळे रोडवर सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:55 IST

नाशिक : दिंडोरी - उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणा-या बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्य मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशोर मोतीराम खांडवी (रा. रासेगाव, ता.दिंडोरी) व त्याचा साथीदार गोपी नागरे (रा. क्रांतीनगर, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली आहे़

ठळक मुद्देसंशयित किशोर खांडवी, गोपी नागरे या दोघांना अटकबोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्य

नाशिक : दिंडोरी - उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणा-या बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्य मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशोर मोतीराम खांडवी (रा. रासेगाव, ता.दिंडोरी) व त्याचा साथीदार गोपी नागरे (रा. क्रांतीनगर, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली आहे़

ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध मद्याची वाहतूक, विक्री तसेच हातभट्टीची दारू तयार करणा-यांवर छापेमारी सुरू आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सोमवारी (दि़१२) मध्यरात्री दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते़ पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना पेठ-दिंडोरी रस्त्याने देशी - विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, पोलीस हवालदार दिपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राउत, गणेश वराडे, अमोल घुगे, विश्वनाथ काकड यांच्या पथकाने दिंडोरी हद्दीतील उमराळे - दिंडोरी रोडवर सापळा रचला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हिरव्या रंगाची बोलेरो कार (एम.एच.०४.डी.एन.१३२५) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये २ लाख ३१ हजार ८८८ रूपयांचा देशी-विदेशी मद्याचा अवैध मद्यसाठा आढळुन आला. पोलिसांनी बोलेरो व मद्यसाठा असा ५ लाख ३१ हजार ८८८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक खांडवी व त्याचा साथीदार नागरे या दोघांना अटक केली़ या दोघांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसliquor banदारूबंदीCrimeगुन्हा