देणगीच्या नावाखाली डांग सेवा मंडळाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:51 IST2018-07-20T17:49:33+5:302018-07-20T17:51:22+5:30

देणगीच्या नावाखाली डांग सेवा मंडळाची फसवणूक
नाशिक : विदेशातून दीड कोटी रुपयांची देणगी देण्याचे आमीष दाखवून बँक आॅफ बडौदामध्ये साडेसात हजार रुपये भरण्यास सांगून डांग सेवा मंडळाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फसवणुकीसह आयटीअॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मृणाल जोशी (रा़ महात्मानगर, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मोबाइलवर १८ व १९ तारखेला ९७६७९९५५२२ व ७४४८१९०२०२ या क्रमाकांच्या मोबाइलवरून फोन आला़ फोन करणाऱ्या संशयिताने सिंगापूर येथील कंपनीतील अधिकारी बोलत असल्याचे सांगत डांगसेवा मंडळास दीड कोटी रुपयांची देणगी देण्याचे आमीष दाखविले़ मात्र, त्यासाठी बँक आॅफ बडौदा, शिरवाळ शाखेत साडेसात हजार रुपये भरण्यास सांगितले़
त्यानुसार जोशी यांनी बँकेत पैसेही भरले मात्र संस्थेस कोणतीही देणगी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी गंगापूर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दिली़