विनाभूल महिलेच्या घशातून दुर्बिनीद्वारे काढला हाडाचा तुकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:43 IST2018-08-21T22:41:54+5:302018-08-21T22:43:11+5:30

नाशिक : खेकडे खात असताना घशात अडकलेल्या हाड महिलेस भूल न देता दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बाहेर काढले आहे़ या डॉक्टरांनी केलेल्या या अवघड शस्त्रक्रियेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़सुरेश जगदाळे यांनी अभिनंदन केले आहे़

nashik,civil,hospital,criticle,operation | विनाभूल महिलेच्या घशातून दुर्बिनीद्वारे काढला हाडाचा तुकडा

विनाभूल महिलेच्या घशातून दुर्बिनीद्वारे काढला हाडाचा तुकडा

ठळक मुद्दे जिल्हा रुग्णालय ; दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून काढले घशात अडकलेले हाड

नाशिक : खेकडे खात असताना घशात अडकलेल्या हाड महिलेस भूल न देता दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बाहेर काढले आहे़ या डॉक्टरांनी केलेल्या या अवघड शस्त्रक्रियेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़सुरेश जगदाळे यांनी अभिनंदन केले आहे़

गिरणारे येथील सुशिला भगवान भोेये ही महिला सोमवारी (दि़२०) खेकडे खात असताना तिच्या घशात खेकड्याचे हाड अडकले़ यामुळे त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता़ त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ या महिलेची डॉ़ संजय गांगुर्डे व डॉ़ शेळकेयांनी तपासणी करून भूल न देता दुर्बिनीद्वारे घशात अडकलेले हाड काढण्याचा निर्णय घेतला़

यानंतर डॉक्टरांनी अवघ्या काही मिनिटात दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून भोेये यांच्या घशात अडकलेले हाड बाहेर काढले़ या घटनेमुळे महिलेस जीवदान मिळाले असून तिच्या कुटुबिंयानी डॉक्टरांचे आभार मानले आहेत़

Web Title: nashik,civil,hospital,criticle,operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.