स्टेट बँक चौकात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:48 IST2018-07-20T17:47:05+5:302018-07-20T17:48:06+5:30
नाशिक : भरधाव वाहनाच्या धडकेत चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्टेट बँक चौकात घडली़ बबन नारायण सूर्यवंशी (रा. राजीवनगर वसाहत, सिडको, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़

स्टेट बँक चौकात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
नाशिक : भरधाव वाहनाच्या धडकेत चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्टेट बँक चौकात घडली़ बबन नारायण सूर्यवंशी (रा. राजीवनगर वसाहत, सिडको, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़
सिडकोतील स्टेट बँक चौकातील हॉटेल गुरुकृपासमोरून रात्री ८ वाजेच्या सुमारास बबन सूर्यवंशी हे रस्ता ओलांडत होते़ यावेळी मुंबईहून नाशिककडे आलेल्या भरधाव वाहनाने सूर्यवंशी यांना धडक दिली़ यामध्ये डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला,तर अपघातानंतर वाहनचालक फरार झाला़
याप्रकरणी भावेश नवसागर यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़