चोरलेल्या धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढून अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:19 IST2018-08-06T17:19:08+5:302018-08-06T17:19:49+5:30
नाशिक : कामावर ठेवलेल्या नोकरानेच धनादेश चोरून त्यावर मालकाची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून रक्कम काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

चोरलेल्या धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढून अपहार
ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा
नाशिक : कामावर ठेवलेल्या नोकरानेच धनादेश चोरून त्यावर मालकाची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून रक्कम काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
शरणपूर रोडवरील संजीव नवल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे कामास असलेला संशयित धीरज मदनलाल मत्सागर (हनुमानवाडी, पंचवटी) याने ३ व ४ आॅगस्टदरम्यान कार्यालयातून बँकेचे दोन धनादेश चोरले़ या चोरलेल्या धनादेशांवर नवल यांच्या बनावट सह्या करून जळगाव जनता सहकारी बँकेच्या सीबीएस शाखेतून ६० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली़
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़