उसनवार पैश्यांतून पळसेतील एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:50 IST2018-08-12T15:50:50+5:302018-08-12T15:50:55+5:30

नाशिक : उसनवार पैसे दिले नाहीत या कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना पळसे येथे घडली़ याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे़

nashik,cash,problem,attack | उसनवार पैश्यांतून पळसेतील एकास मारहाण

उसनवार पैश्यांतून पळसेतील एकास मारहाण

ठळक मुद्देपळसे येथल घटना

नाशिक : उसनवार पैसे दिले नाहीत या कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना पळसे येथे घडली़ याप्रकरणी नाशिकरोडपोलिसांनी तिघा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे़

चेहेडी गावठाण येथील रहिवासी सोमनाथ कृष्णा ताजनपुरे यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि़१०) सायंकाळी मित्रासह पळसे येथील हॉटेल साईमध्ये गेले होते़ ५ वाजेच्या सुमारास ते हॉटेलमधून बाहेर पडत असताना संशयित हेमंत ताजनपुरे हा तिथे आला व दहा हजार रुपये उसनवार मागितले़ त्यास पैसे देण्यास नकार देताच टेबलावरील काचेचा ग्लास सोमनाथ ताजनपुरे यांच्या डोक्यात फोडला़ यामध्ये जखमी झाल्याने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़

यानंतर संशयित हेमंतचे वडील, पत्नी व भावजई यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे़

Web Title: nashik,cash,problem,attack