महामंडळाच्या सर्व बसेस स्थानकातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 20:44 IST2018-08-09T20:41:35+5:302018-08-09T20:44:29+5:30
नाशिक : मराठा आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस लक्ष्य केले जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाने आज एकही बस रस्त्यावर आणली नाही. त्यामुळे महामंडळाला आर्थिक फटका बसला असला तरी बसेसचे नुकसान मात्र टळले. नाशिकच्या सुमारे साडेआठशे बसेस स्थानकातच उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. असे असले तरी बुधवारी मध्यरात्रीच काही समाजकंटकांनी स्थानकात घुसून बसेसच्या काचा फोडल्या.

सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंद मुळे राज्य परिवहन महामंडळाने एकही बस रस्त्यावर आणली नाही. मागील महिन्यात झालेल्या आंदोलनात नाशिक विभागाच्या अकरा बसेसचे ठिकठिकाणी नुकसान झाले होते. या आंदोलनात बसेस स्थानकातच थांबविण्यात आल्यामुळे बससेचे संभाव्य नुकसान टळले. यामुळे महमंडळाचे सुमारे सव्वाकोटी रूपयांचे नुकसान झाले. दररोज ३ लाख १५ हजार किलोमीटर धावणाऱ्या बसेसला ब्रेक लागला होता. महामंडळाच्या सुमारे साडेआठशे बसेसच्या माध्यमातून दररोज प्रवासी वाहतूक केली होती.
दरम्यान, आंदोलन सायंकाळी शांत झाल्यानंतर शहरातील अनेक भागात व्यवहार काही प्रमाणात सुरळीत झाले असले तरी बसेस बंदच ठेवण्यात आल्या होत्या. बसस्थानकात प्रवाशीच नसल्याने बसेस सोडण्यात आल्या नाहीत मात्र रात्री १२ वाजेनंतर बससेवा पुर्ववत करण्यात आली.