शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

आरटीई बाबत उच्चमध्यमवर्गातच जागरूकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 4:38 PM

: शिक्षण हक्काच्या २५ टक्के प्रवेशासाठी पालकांमध्ये जागरूकता वाढली असली तरी या योजनेंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या  सधन कुटुंबाकडूनदेखील अर्ज दाखल केले जात असल्याने मूळ लाभार्थी वंचित राहण्याचीच शक्यता आहे.

ठळक मुद्देआर्थिक दुर्बल घटकातील पाल्याना योजनेबाबतची माहिती नाहीरांगेत उच्चमध्यमवर्गीयच अधिक

नाशिक : शिक्षण हक्काच्या २५ टक्के प्रवेशासाठी पालकांमध्ये जागरूकता वाढली असली तरी या योजनेंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या  सधन कुटुंबाकडूनदेखील अर्ज दाखल केले जात असल्याने मूळ लाभार्थी वंचित राहण्याचीच शक्यता आहे. वास्तविक या योजनेबाबतची जागरूकता उच्चमध्यमवर्गीयांमध्येच अधिक असून, आर्थिक दुर्बल घटकातील मूळ पालक आणि त्यांचे पाल्य यांना या योजनेबाबतची पुरेशी माहिती नसल्याचे सायबर कॅफेवरील गर्दीवरून दिसून येत आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली व नर्सरीतील पटसंख्येच्या २५ टक्के जागा या समाजातील दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवल्या आहेत. या जागांवर आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले जात आहेत. गेल्या तीन दिवसांत दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता या योजनेला पालकांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे यातील अर्जदार हे आर्थिक दुर्बल घटनेचे आहेत की नाही ही तपासणारी संगणकातील यंत्रणा केवळ प्रक्रिया पूर्ण करणारी असल्याने अर्जदार खरेच आर्थिक दुर्बल घटकातील आहेत का हा विषय यावर्षीही संशोधनाचाच ठरणार आहे. मागील वर्षी उत्पन्नाच्या दाखल्यांमध्ये झालेला गोंधळ लक्षात घेऊन उत्पन्नाचा दाखला तपासण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, यंदा दाखल होणाऱ्या  अर्जांची संख्या पाहता अशाप्रकारची तपासणी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळतो की नाही हा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.सर्वसामान्यपणे मोलमजुरी करणाऱ्या  दारिद्र्यरेषेखालील पालकांना दररोजच्या रोजगाराची चिंता असते. तसेच रोज कमाई आणि रोजचा खर्च करणाऱ्यानाही रोजगाराच्या शोधार्थ सकाळीच घराबाहेर पडावे लागते. ज्या पालकांचे उत्पन्न खरोखरच एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांना रांगेत उभे राहून आपल्या मुलांसाठी आरटीईचा लाभ घेण्याला सवडदेखील नाही. त्यामुळे या रांगेत उच्चमध्यमवर्गीयच अधिक असल्याचे दिसून येतात. त्यामुळे मूळ योजना कितीही चांगली असली तरी ज्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे अशा घटकांपर्यंत आरटीई अद्याप पोहचला नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा