गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 16:46 IST2019-07-26T16:46:44+5:302019-07-26T16:46:54+5:30
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. गुरुवारपर्यंत ...

गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरसह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. गुरुवारपर्यंत ५६ टक्के असलेला पाणीसाठा शुक्रवार दुपारपर्यंत ६१ टक्के इतका झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सात जुलै रोजी झालेल्या पावसानंतर धरणाच्या पातळीत वाढच झाली नसल्याने सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान, नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणा धरण ८२ टक्के भरले आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दाटून आलेले आभाळ, तर कधी ऊन, मधूनच डोकावणारा पाऊस अशा वातावरणामुळे नाशिककरांना पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या तीन दिवसांपासून शहर, जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केला जात आहे. गंगापूर धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात तर पावसाची संततधार सुरू झाल्याने गंगापूर धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. इगतपुरीतही पावसाचे दरमदार आगमन झाले आहे. गेल्या चोवीस तासात इगतपुरीत १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पेठ तालुक्याने इगतपुरीलाही मागे टाकले असून, येथे १०९ मि.मी. पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरला ६१ टक्के पाऊस बरसला
शहर, जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ नक्कीच झाली आहे. गुरुवारपर्यंत ५६ टक्के असलेले गंगापूरधरण शुक्रवारी ६१ टक्के भरले होते, तर कश्यपी ३९, गौतमी ४१ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा ५२ टक्के इतका झाला आहे.