आठ लाख ग्राहकांकडे १११ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 18:51 IST2019-11-21T18:50:41+5:302019-11-21T18:51:35+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, औदयोगिक व वाणििज्यक वर्गवारीच्या ८ लाख १२ हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास १,११ (एकशे ...

आठ लाख ग्राहकांकडे १११ कोटींची थकबाकी
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, औदयोगिक व वाणििज्यक वर्गवारीच्या ८ लाख १२ हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास १,११ (एकशे अकरा) कोटी ६२ लाख रु पये थकबाकी असुन ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. यामध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्या ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे. शिवाय शुल्क भरल्यानंतर पुनर्जजोडणी करण्यासाठी प्रादेशिक भागानुसार २४ तास तसेच ४८ तासापर्यंतचा अवधी लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक व मालेगाव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सातत्याने पाठपुरावा करून मंडळ कार्यालयाच्या विजबिलांच्या थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडीÞग ,वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक दिलेल्या मुदतीत भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम राबविण्यात येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.