नाशिक- त्र्यंबकरोडवर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वार जागीच ठार 

By नामदेव भोर | Updated: June 20, 2023 16:18 IST2023-06-20T16:10:34+5:302023-06-20T16:18:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : त्र्यंबकेश्वर नाशिक  मार्गावर भरधाव वेगातील कारचे  टायर फुटून झालेल्या अपघातात दोन ...

Nashik- Two bikers killed on the spot due to car tire burst on Trimbak road | नाशिक- त्र्यंबकरोडवर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वार जागीच ठार 

नाशिक- त्र्यंबकरोडवर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वार जागीच ठार 

लोकमत न्यूज नेटवर्क 

लोकमत न्यूज नेटवर्क 
नाशिक : त्र्यंबकेश्वर नाशिक  मार्गावर भरधाव वेगातील कारचे  टायर फुटून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे भरधाव वेगात येणाऱ्या कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळून दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या लेनवर आल्याने कारने त्र्यंबककडे जाणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले असून नामदेव विठ्ठल शिद आणि सुनील मनोहर महाले अस अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल संस्कृती  समोर सोमवारी रात्री  ८ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे भरधाव वेगात येणाऱ्या होंडा सिटी कार (एमएच २६ एके ३०६१) चे अचानक टायर फुटल्याने कार  रस्त्याच्या दुभाजकावर आदळून नाशिककडून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रस्त्यावर आल्याने या रस्त्यावर  समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना कारने जोरदार धकड दिली. अपघाताची ही थरारक घटना हॉटेलच्याच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात हॉटेल बाहेरच रोडच्या कडेला उभी असलेली एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. तर कारच्या धडकेत राजेवाडी येथील नामदेव विठ्ठल शिद आणि वाढोली येथील सुनील मनोहर महाले या दुचाकी चालकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

Web Title: Nashik- Two bikers killed on the spot due to car tire burst on Trimbak road

टॅग्स :Accidentअपघात