शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

नाशिक तालुका बालिका जन्मदरात अव्वल; मात्र मनपा हद्दीत पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:07 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालिका जन्मदरात नाशिक तालुका अग्रस्थानी असला तरी महापालिका हद्दीत बालिकांच्या जन्मदरात मोठी तफावत दिसून येत आहे. नाशिक तालुक्यात एक हजार मुलांमागे १०३१ बालिकांचा जन्म झाला असला तरी महापालिका हद्दीत हेच प्रमाण डिसेंबरअखेर अवघे ९१८ इतकेच म्हणजेच तालुक्याच्या तुलनेत तब्बल ११३ ने कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नाशकात अत्यल्प झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालिका जन्मदरात नाशिक तालुका अग्रस्थानी असला तरी महापालिका हद्दीत बालिकांच्या जन्मदरात मोठी तफावत दिसून येत आहे. नाशिक तालुक्यात एक हजार मुलांमागे १०३१ बालिकांचा जन्म झाला असला तरी महापालिका हद्दीत हेच प्रमाण डिसेंबरअखेर अवघे ९१८ इतकेच म्हणजेच तालुक्याच्या तुलनेत तब्बल ११३ ने कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.नाशिक जिल्ह्यात बालिका जन्मदराचे प्रमाण अपवादात्मक एक-दोन तालुके वगळता सदैव ९५० च्या आसपास राहिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कधीही मोठ्या प्रमाणात लिंगभेद झाल्याचे निष्पन्न झालेले नाही किंबहुना लिंगनिदान घटना उघडकीस येण्याचे प्रकारदेखील राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नाशकात अत्यल्प झाले आहे. गत आर्थिक वर्षात बालिका जन्मदरात जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये नाशिक तालुका (१०३१) अव्वल होता. तर त्यापाठोपाठ कळवण १००८ बालिका जन्मासह द्वितीयस्थानी आणि दिंडोरी आणि मालेगाव हे दोन्ही तालुके ९९२ जन्मदरासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहे.अन्य तालुक्यांपैकी बागलाण आणि देवळा वगळता अन्य तालुकेदेखील ९५० पेक्षा अधिक बालिका जन्मदर असलेले आहेत. केवळ देवळा ९२७ आणि बागलाण ९१९ असा जन्मदर आहे. मात्र, नाशिक महापालिका हद्दीत हा जन्मदर बागलाणपेक्षाही एका संख्येने कमी असा ९१८ पर्यंत घसरलेला आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीत हा बालिकांचा जन्मदर घसरण्याच्या कारणांचा छडा लावण्याच्या उद्देशाने यंत्रणेला कार्यप्रवण करण्याची गरज निर्माण झाली आहे.डॉक्टरांसह सामान्य नागरिकांमध्येदेखील लिंगभेदाबाबत खूप चांगली जागृती झालेली आहे. त्यात लिंगनिदानसारख्या कायद्यांबाबत शासनाकडून कायदे अत्यंत कठोर करण्यात आले असून, ते तितक्याच कठोरपणे राबवले जात आहेत. त्याशिवाय नाशिक महापालिका हद्दीमध्ये महापालिकेची यंत्रणादेखील जागरूकतेने आणि प्रभावीपणे कार्यरत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत बालिका जन्मदराचे प्रमाण हे फार कमी नसायला हवे. मात्र काही अपवादात्मक घटना घडत असल्यास माहिती नाही. पण हा योगायोगदेखील असू शकेल, असे वाटते. - डॉ. निवेदिता पवार, स्रीरोगतज्ज्ञ

टॅग्स :talukaतालुकाNashikनाशिक