शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:18 PM

यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली.

ठळक मुद्दे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधीरपणाला निमंत्रण देणारा ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा शुभारंभ हॉर्न किती वेळा वाजविला व ताशी ४० कि.मीची वेगमर्यादा किती वेळा ओलांडली यावर गुणांकन

नाशिक : ‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली.वाढते शहरीकरण व दिवसेंदिवस रस्त्यावर वाढणारी वाहने यामुळे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधीरपणाला निमंत्रण देणारा ठरत आहे. वाढते ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आता नाशिक पोलीस आयुक्तालयानंतर प्रादेशिक परिवहन विभागानेही जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला सोमवारी परिवहन कार्यालयाच्या आवारातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन विभागाने उपस्थित टॅक्सीचालक, रिक्षाचालकांना ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा प्रचार-प्रसार करणा-या कॅप दिल्या. तसेच वाहनांच्या दर्शनी भागावर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ असे शाब्दिक आवाहन असलेले स्टिकर लावण्यात आले. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यासह आदि अधिकारी व टॅक्सी संघटना, वाहतूक संघटना, स्कूल बस चालक संघटना, रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांवर कमाल वेगमर्यादा ताशी चाळीस किलोमीटर एवढी असावी, तसेच रस्त्यांवरून वाहतुक करताना हॉर्नचा अनावश्यकरिता केला जाणारा वापर टाळावा या दोन निकषांवर आधारित परिवहन विभागाने स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत सहभागी होणा-या वाहनचालकांकडून विहित नमुना अर्ज भरुन घेण्यात आला.

अशी पार पडली स्पर्धाया स्पर्धेत सुमारे तीस वाहनचालक सहभागी झाले होते दुचाकी-चारचाकी वाहनचालकांसाठी असलेल्या या स्पर्धेचा मार्ग पेठ फाटा (भक्तीधाम) डावीकडे वळण घेत निमाणी स्थानक, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालीमार, शरणपूररोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, रामवाडी पूलावरून मखमलाबाद नाकामार्गे पेठ फाट्यावरील परिवहन विभागाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला. या मार्गावर सहभागी स्पर्धक वाहनचालकांवर पर्यवेक्षकांनी नियंत्रण ठेवत अर्जावर विहित नमुन्यात नोंदी नोंदविल्या. यामध्ये प्रामुख्याने हॉर्न किती वेळा वाजविला व ताशी ४० कि.मीची वेगमर्यादा किती वेळा ओलांडली यावर गुणांकन करण्यात आले. यासोबत वाहतुक नियमांचे अन्य नियमांचे कसे उल्लंघन केले व कोणत्या स्वरुपात तेदेखील संबंधिताच्या प्रवेश अर्जावर नमुद करण्यात आले. यासाठी ९० पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिकpollutionप्रदूषणTrafficवाहतूक कोंडी