अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:23 IST2018-06-09T02:23:09+5:302018-06-09T02:23:09+5:30
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून ढाबा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली.

अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांचा छापा
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाट्याजवळील ढाब्यावर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करून ढाबा मालक, व्यवस्थापक व अन्य दोन अशा चौघा संशयितांना अटक केली.
पुणे महामार्गावरील चिंचोली फाटा येथील ओम साई मामा फौजी ढाबा या ठिकाणी दोन महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळाली होती़ कोकाटे यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशिकरोड पोलिसांनी या ढाब्यावर बनावट गिºहाईक पाठवून खात्री केली़ पोलिसांची खात्री झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली़ त्यातील एक पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील गामघाटा येथील, तर दुसरी अहमदनगर जिल्ह्यातील दौंड रोड परिसरातील आहे़ पोलिसांच्या या कारवाईदरम्यान हॉटेलमधील काही संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले़ नाशिकरोड पोलिसांनी ओम साई मामा फौजी ढाब्याचे मालक सुनीचरण जगबंधू जेना व संजू सुनीचरण जेना (१९, दोघे रा. पार्थअंजन रो-हाउस, लवटेनगर, जयभवानी रोड, नाशिकरोड), व्यवस्थापक प्रफुल्ल लक्ष्मीधर प्रधान (३१, रा. रो-हाउस नंबर ६, लवटे मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड), पुरुषोत्तम दशरथ नायर (४७, रा. किस्मत, कृष्णपूर, वासुदेवपूर, भद्रक, ओरिसा) या चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.