नाशिकरोडला डासांची घनता जास्त
By Admin | Updated: April 9, 2015 00:12 IST2015-04-09T00:12:26+5:302015-04-09T00:12:41+5:30
नाशिकरोडला डासांची घनता जास्त

नाशिकरोडला डासांची घनता जास्त
नाशिक : शहरात नाशिकरोड विभागात डासांची सर्वाधिक घनता ४.२३ इतकी आढळून आली असून, डासांच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. डासांची उत्पत्ती वाढत असताना महापालिकेकडून मात्र धूर व औषध फवारणी होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरम्यान, संपूर्ण शहरातील डासांची घनता मोजण्यासाठी महापालिकेकडे अवघे दोनच कर्मचारी असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विभागनिहाय डासांची घनता मोजली जाते. त्यानुसार धूर व औषध फवारणीचे वेळापत्रक निश्चित केले जाते. ज्या विभागात पाचहून अधिक डासांची घनता असेल तो विभाग अधिक धोकादायक मानला जातो. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार नाशिकरोडला सर्वाधिक ४.२३ घनता आढळून आली.