शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

नाशिककरांनी जाणून घेतली रानभाज्यांची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 9:43 PM

नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्यांचा वेगवेगळ्या आजारांमध्ये होणारा उपयोग याची माहिती संबंधित आदिवासी शेतकऱ्यांकडून जाणून घेत रानभाज्यांची खरेदीही केली.

ठळक मुद्देजागतिक आदिवासी दिन : राज्याच्या कृषी विभागाचा उपक्रम

नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवास नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या रानभाज्या आणि त्यांचा वेगवेगळ्या आजारांमध्ये होणारा उपयोग याची माहिती संबंधित आदिवासी शेतकऱ्यांकडून जाणून घेत रानभाज्यांची खरेदीही केली.प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, आमदार सरोज आहेर, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार हेमंत टकले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षक प्राचार्य संजय पाटील, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, उपसंचालक कैलास शिरसाठ, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, कैलास खैरनार, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना भुसे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेतून गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून रानभाज्यांच्या विक्र ीसाठी शहरांमध्ये कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेतून शेतीमालाला गुदामे, स्टोअरेज, कोल्ड स्टोअरेजदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोरोना रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे व टिकविणे गरजेचे आहे. रानभाज्या प्रथिने, पोषणद्रव्य व जीवनसत्वयुक्त असून, इम्युनिटी बुस्टर म्हणून त्यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो, असे भुसे यावेळी म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्र मात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विमल आचारी, मारुती पवार, मधुकर बांगारे, मनोहर चौधरी, सीताराम चौधरी, अनिल पवार तसेच आदर्श शेती शेतकरी गट या शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच के. के. वाघ उद्यान महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापिका अश्विनी चोथे यांचादेखील यावेळी कृषिमंत्र्यांनी गौरव केला. महोत्सवाचा समारोप विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झाला.रानभाज्यांची पाककृती यू-ट्यूबवर टाकावीमहोत्सवात जवळपास ८६ रानभाज्यांचे प्रकार उपलब्ध होते. हा ठेवा आपणास जपायचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या रानभाज्यांच्या पाककृती यू-ट्यूबसारख्या माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी केले.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार