नाशिकला शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठीचे मतदानास शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 11:23 IST2018-06-25T11:22:57+5:302018-06-25T11:23:19+5:30

 In Nashik, peaceful voting for voters' constituency elections | नाशिकला शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठीचे मतदानास शांततेत

नाशिकला शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठीचे मतदानास शांततेत

नाशिक- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शहरातील २५ मतदान केंद्रांवर सोमवारी(दि.२४) सकाळपासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून सकाळी नऊ वाजेपर्यंत विभागात ८.३४ टक्के मतदान झाले आहे. बि. डी. भालेकर मतदान केंद्रावर दराडे, पाटील समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची चर्चा सोशल मिडीयावर होत असली तरी प्रत्यक्ष तसा काही प्रकार झाला नसल्याची माहिती पोलीसांनी दिली. दोन्ही गटाच्या समर्थकांना समज देण्यात आला असून मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व निवडणूक अधिकारी खबरदारी घेत आहेत.

Web Title:  In Nashik, peaceful voting for voters' constituency elections