शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Nashik Oxygen Leak: नाशिकच्या घटनेनं तुकाराम मुंडे सुन्न...; नाशिककरांचाही साहेबांना भावनिक रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 23:21 IST

Nashik Oxygen Leak: राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला.

ठळक मुद्देराज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला

मुंबई - नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांची सचिवालयात बदली करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत तुकाराम मुंडे यांनी नागपूरमध्ये भरीव काम केलं. नागपूरमधील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आणि रुग्णांना चांगली सेवा देण्यात त्यांना जराही कसर सोडली नाही. त्यामुळेच, नागपूर येथून तुकाराम मुंडेंची बदली झाल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते. तुकाराम मुंडेंनी आज नाशिकमधील ऑक्सिजन टाकी गळतीच्या दुर्घटनेबाबत फेसबुकवरुन शोक व्यक्त केलाय. त्यावरही, नाशिककरांना त्यांची आठवण झाली आहे. 

राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक दिग्गज नेत्यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शब्दात व्यक्त न होण्यासारखं हे दु:ख असल्याचं म्हटलंय. या दुर्घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळला असून शोकमग्न झाला आहे. नाशिक महापालिका आयुक्तपदी यापूर्वी काम केलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंनीही या घटनेबाबत दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत.

 

नाशिकची दुर्घटना अत्यंत दुर्दवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेनं आपण सुन्न... निशब्द... झालो आहोत, अशी भावना सनदी अधिकारी आणि नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडेंनी व्यक्त केली आहे. तुकाराम मुंडेंनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुनही दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी, एका युजर्संने कमेंट करुन तुकाराम मुडें साहेब, नाशिकला आज आपण हवे होतात, अशी भावना व्यक्त केली. तुमच्या नेतृत्वात उत्कृष्ट प्रशासनाचा अनुभव नाशिककरांनी घेतला असता, असेही त्याने म्हटले आहे. 

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने नाशिकमधून अवघ्या नऊ महिन्यांत बदली झाली होती. गेल्या बारा वर्षातील मुंढे यांची ती अकरावी बदली ठरली. त्यांची २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याआधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते.

नाशकात महापालिकेने संमत केलेली अडीचशे कोटी रुपयांची कामे रद्द करण्यावरून त्यांची तेथील पदाधिकाऱ्यांसमवेत पहिली ठिणगी पडली. १ मार्चपासून त्यांनी वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा करताना हरित पट्ट्यासह पार्किंग आणि अन्य मोकळ्या जागांवर करवाढ केल्याने आंदोलने पेटली. नाशिक महापालिकेत मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची घटनाही घडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे ही नामुष्की टळली असली होती. त्यामुळे, नाशिकमध्येही तुकाराम मुंडे यांच्या कामाची जोरदार चर्चा होती. त्यामुळेच, नागरिकांचा त्यांना पाठिंबा होता. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढेNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती