Nashik Oxygen Leak: How did the oxygen leak accident happen in Nashik? Watch exclusive footage of CCTV | Nashik Oxygen Leak: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना कशी घडली? पाहा सीसीटीव्हीचे एस्क्लुझिव्ह फुटेज

Nashik Oxygen Leak: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना कशी घडली? पाहा सीसीटीव्हीचे एस्क्लुझिव्ह फुटेज

ठळक मुद्देनाशिक महापालिकेने रुग्णालयात आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्यामुळे ही घटना स्पष्ट झाली आहे.

नाशिक - गेल्या बुधवारी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती नंतर 24 रुग्णांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली आणि ऑक्सिजनची गळती कशी झाली? याचे सीसीटीव्ही फुटेज 'लोकमत'ला मिळाले आहे. (Nashik Oxygen Leak: How did the oxygen leak accident happen in Nashik? Watch exclusive footage of CCTV)

दुपारी 11.55 वाजेच्या सुमारास या ठिकाणी ऑक्सिजन टँकर दाखल झाला. 12 वाजून तीन मिनिटांनी त्यासाठी पाईप जोडणीला सुरुवात झाली आणि बारा वाजून 12 मिनिटांनी व्हॉल्व तुटल्याने ऑक्सिजन गळती सुरू झाली. त्यामुळे परिसरात वाफ आणि धुके पसरले. 12. 15 मिनिटांनी रुग्णालयात होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला. 12.16 वाजता अग्निशमन दलाला कळविण्यात आले. 12.25 म्हणजे अवघ्या 9 मिनिटात अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.


यानंतर 12.26 मिनिटांनी पाण्याची फवारणी करण्यात आले.12.30 वाजता गळती नक्की कुठून होत आहे, तो व्हॉल्व सापडला. 12.32 वाजता गळती रोखण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. त्यानंतर 2 मिनिटांनी म्हणजे 12.34 वाजता रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत झाला. पण अवघ्या 32 मिनिटांत मात्र तात्काळ 22 रुग्णांचे प्राण गेले. नाशिक महापालिकेने रुग्णालयात आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्यामुळे ही घटना स्पष्ट झाली आहे.
 

Read in English

Web Title: Nashik Oxygen Leak: How did the oxygen leak accident happen in Nashik? Watch exclusive footage of CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.