शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नाशिकमधील चेहडी शिवारात गोळीबारात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 21:27 IST

संशयित निलेश हा दुचाकीवर पाठीमागे बसलेला होता त्याने कमरेला लावलेले गावठी पिस्तुल काढत विजयच्या दिशेने रोखून ‘माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, थांब तुझा गेमच करतो’ असे बोलत गोळी झाडली.

ठळक मुद्दे‘माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, थांब तुझा गेमच करतो’ नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल

नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील चेहडी शीवमधील ताजनपुरे मळ्यात एका गॅरेजपुढे सोमवारी (दि.६) संध्याकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. गोळीबारानंतर संशयित हल्लेखोर मनमाड पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला व त्याच्या दुसऱ्या साथीदारास नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानकपणे झालेल्या या गोळीबाराने परिसरात एकच धावपळ उडाली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील ताजनपुरे मळा येथे राहणारे विजय यशवंत खराटे हे संध्याकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घराजवळील वैभव गॅरेज येथे गेले होते. त्याठिकाणी वैभव केनगर, प्रकाश कदम, विशाल अवारे आदी सर्व उभे असताना खराटे हे त्यांच्याशी गप्पा मारत होते. यावेळी त्यांचा शेजारी असलेला युवक निलेश निवृत्ती भाबड हा त्याचा चुलत भाऊ सचिन दिलीप भाबडसोबत मोटरसायकलवर गॅरेजजवळ आला. संशयित निलेश हा दुचाकीवर पाठीमागे बसलेला होता त्याने कमरेला लावलेले गावठी पिस्तुल काढत विजयच्या दिशेने रोखून ‘माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, थांब तुझा गेमच करतो’ असे बोलत गोळी झाडली. यानंतर निलेश व सचिन हे दोघे दुचाकीवरून पसार झाले. गोळीचा आवाज होताच आजुबाजुचे सर्व जमलेले लोक पांगले. गोळी विजयच्या उजवल्या गालात लागून जबड्यात रूतल्याने ते जमिनीवर कोसळले. तोंडावाटे वेगाने रक्तस्त्राव सुरू झाल्याने जखमी अवस्थेत विजय यांना नागरिकांनी उचलून तत्काळ जवळच्या खासगी रु ग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. विजय यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, सुनील रोहकले यांच्यासह फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी जखमी विजय यांची रूग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करत माहिती घेतली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी