नाशिकमध्ये कोरोनाच्या भीतीने एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:40 IST2020-04-11T13:37:47+5:302020-04-11T13:40:26+5:30
नाशिक- जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला.

नाशिकमध्ये कोरोनाच्या भीतीने एकाची आत्महत्या
नाशिक- जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नाशिक शहरातील नाशिकरोड येथील एका युवकाने आपल्याला कोरोना झाला आहे, असे स्वत:च लिहून ठेवत आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला.
नाशिक शहरातील नाशिकरोड भागातील हा युवक प्लंबींगचे काम करतो. आज सकाळी साडे आठ वाजता त्याने आपल्या घरातील बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने सुसाईड नोट लिहीली असून त्यात मला कोरोना झाला आहे आहे. पोलीसांना कळवावे असे नमुद केले आहे. या युवकाचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे. तथापि, वैद्यकिय तपासणीनंतरच त्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याचा उलगडा होईल असे पोलीसांनी सांगितले.
मृत युवकाच्या पश्चात आई वडील आणि पत्नी असा परीवार आहे. त्याचा एक भाऊ दिल्ली येथे काम करतो. कोरोना झाला आहे किंवा नाही याचा उलगडा झाला नसतानाही एकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये कोरोना हातपाय पसरु लागला आहे. आज सकाळीच मालेगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याने आता पर्यंत जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाधीतांची संख्या सोळा झाली आहे. मालेगाव मध्ये सर्वाधिक पॉझीटीव्ह रूग्ण असले तरी नाशिक शहरातही संख्या तीन वर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.