Nashik: नाशिकच्या राष्ट्रवादीला गळती सुरू, माजी नगरसेवक नाना महाले शरद पवार गटात
By संजय पाठक | Updated: July 7, 2024 17:30 IST2024-07-07T17:26:29+5:302024-07-07T17:30:29+5:30
Nashik News: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर एकंदरच बदलेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागणार असल्याची चर्चा होती, ती अखेरीस खरी ठरली असून नाशिकमध्ये ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रदेश सचिवपद भूषवणारे नाना महाले यांनी आज मुंबई येथील शरद पवार गटात प्रवेश केला.

Nashik: नाशिकच्या राष्ट्रवादीला गळती सुरू, माजी नगरसेवक नाना महाले शरद पवार गटात
- संजय पाठक
नाशिक - लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर एकंदरच बदलेल्या राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागणार असल्याची चर्चा होती, ती अखेरीस खरी ठरली असून नाशिकमध्ये ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रदेश सचिवपद भूषवणारे नाना महाले यांनी आज मुंबई येथील शरद पवार गटात प्रवेश केला.
नाना महाले हे मुळचे काँग्रेस पक्षाचे नेते असून १९९२ मध्ये ते सर्व प्रथम नाशिक महापालिकेत निवडून आले होते.नंतर त्यांचे पुतणे राजेंद्र महाले हे सिडकोतून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राजेंद्र महाले यांनी भाजपतमध्ये प्रवेश केला असताना नाना महाले यांनी मात्र शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी नगरसेवक दत्ता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.