शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

Nashik: ‘त्या’ १२ रहिवाशांना नाशिक मनपाच्या नोटिसा

By suyog.joshi | Published: October 27, 2023 8:57 PM

Nashik: शहरातील कर्मयोगीनगरमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे दोन बळी गेल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी या भागात भेट देवून माहिती घेतली, कर्मचार्यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या.

-  सुयोग जोशीनाशिक - शहरातील कर्मयोगीनगरमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे दोन बळी गेल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी या भागात भेट देवून माहिती घेतली, कर्मचार्यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या. डेंग्यूची उत्पत्तीस्थाने आढळल्याने १२ रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या.

कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगरसह प्रभाग २४ मध्ये घरोघरी तापाने फणफणणारे रुग्ण असून, त्यांची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम साईटवर पाण्याचा साठा असल्याने ही ठिकाणे डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने झाली आहेत. बांधकामाची माती व इतर साहित्य नाल्याच्या कडेला व रस्त्यावर टाकले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली होती. नगररचनाचे उपअभियंता रवींद्र बागुल, प्रदीप भामरे यांनी या भागात बांधकाम साईटला भेट दिली. पाणी साठवू नये, माती व इतर मटेरियल रस्त्यावर टाकू नये, अशा सूचना बांधकाम व्यावसायिकांना दिल्या. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी पथकासह या भागात ठिकठिकाणी जावून पाहणी केली. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याच्या सूचना दिल्या. डेंग्यू संशयित रुग्ण आढळलेल्या इमारतींच्या परिसराची पाहणी केली. डास प्रतिबंधक फवारणी करण्याच्या सूचना कर्मचार्यांना दिल्या. परिसरातील नागरिकांशी चर्चा करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती दिली. डेंग्यू संशयितांची संख्या जास्त असलेल्या भागात घरोघरी जावून माहिती संकलीत करणार असल्याचे त्र्यंबके यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब गायकवाड , चारुशीला गायकवाड , मगन तलवार, राहुल काळे, घनश्याम सोनवणे, जी. एस. गांगुर्डे आदींसह नागरिक हजर होते. प्रभागात दोन दिवसांपासून डास निर्मूलन मोहीम सुरू झाली असून, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली जात आहेत. फवारणी केली जात आहे.

साईडपट्टयांमुळे अस्वच्छताकर्मयोगीनगर येथील नाल्यालगत रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ढिग गेल्या सहा वर्षापासून हटविले जात नाहीत. रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्या साफ केल्या जात नाहीत. यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाचे हेतुपुरस्कर होणारे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहे. वेळीच दखल घेवून उपाययोजना न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक