Nashik Municipal Women's and Child Welfare Committee is the only BJP candidate | नाशिक मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भाजपाकडेच
नाशिक मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भाजपाकडेच

ठळक मुद्दे कांडेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड निश्चीतअन्य समित्यांमध्ये शिवसेनेचे आव्हानयुती धर्म निभावण्याची शिवसेनेला अपेक्षा

नाशिक-नाशिक महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे
महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी बुधवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून भाजपाचे बहुमत असतानाही शिवसेनेने देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे युतीतच रस्सीखेच होणार आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधार समिती तसेच वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणूका गुरूवारी (दि.१८) होणार आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. प्रत्येक समितीत एकुण नऊ सदस्य असून त्यातील पाच सदस्य भाजपाचे असल्याने समितीवर याच पक्षाचे वर्चस्व आहे. परंतु भाजपा बरोबरच सेनेने देखील अर्ज भरले आहेत. देशात आणि राज्यात महापालिकेची युती आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेत देखील युती व्हावी त्यासाठी सेनेलाही सत्तेचा वाटा मिळावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी सांगितले.
समित्या आणि त्यात अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे पुढिल प्रमाणे-

महिला व बाल कल्याण समिती- सभापतीपद- हेमलता कांडेकर (भाजपा) उपसभापती- रंजना प्रकाश बोराडे (शिवसेना), डॉ. सीमा ताजणे (भाजपा)

वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व डॉ. दिपाली कुलकर्णी (दोघेही भाजपा) उपसभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व पुनम धनगर (भाजप)

शहर सुधार समिती- सभापती- सुदाम डेमसे (शिवसेना), अनिल ताजनपुरे (भाजपा), उपसभापती- सुदास डेमसे (शिवसेना), छाया देवांग (भाजपा)

विधी समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), सुमन सातभाई (भाजपा), उपसभापती- चंद्रकांत खाडे व सूर्यकांत लवटे (शिवसेना), नीलेश ठाकरे (भाजपा)

 

 


Web Title: Nashik Municipal Women's and Child Welfare Committee is the only BJP candidate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.