शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 17:39 IST

Girish Mahajan vs Raj Thackeray Uddhav Thackeray: नाशिकच्या प्रचारसभेत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या कडाडून टीका

Girish Mahajan vs Raj Thackeray Uddhav Thackeray: पावसाळा आल्यानंतर जसे बेडूक बाहेर येतात, तसे ठाकरे बंधू निवडणूक असल्यामुळे बाहेर पडले आहेत. निवडणूक आली की नाटकं करतात. लोक येतात, शिट्ट्या मारतात, पण मतांमध्ये त्याचे परिवर्तन होत नाही. पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे होती, तेव्हा तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाल्लेत. लोक आता यांना स्वीकाराला तयार नाही. लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आता मतदार महायुतीवर विश्वास ठेवतात. मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी एक तरी महानगरपालिका जिंकून दाखवावी, अशा शब्दांत रविवारी नाशिक येथील प्रचारसभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंवर टीकेची तोफ डागली.

"नाशिकसह सर्व महापालिकांची निवडणूक आता २ दिवसांवर आली आहे. नाशकात आपल्याला १२२ पैकी १००हून जास्त नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. या वेळेसही कुंभमेळा आहे. आपल्याला भरपूर काम करायचे आहे. प्रयागराजपेक्षा मोठा कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. अर्धी कामे सुरू आहेत, अर्धी कामे आचारसंहिता संपली का सुरू होतील. आपण सर्व रस्ते सिमेंटचे करणार आहोत. म्हणजे पुढली २० वर्ष एकही खड्डा पडणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाकुडतोड्या टीकेला प्रत्युत्तर

"तपोवनातील झाडांचा मुद्दाम विषय वाढवला जात आहे. आंदोलनामध्ये डाव्या विचारसरणीची लोकं शिरली आहेत. हे लोक मुद्दाम आमच्या झाडांना चिटकून बसलेले आहेत. परवा झालेल्या सभेत ठाकरे ब्रँड इकडे आला आण मला लाकूडतोड्या म्हणाला. आदित्य ठाकरे यांना इतक्या दिवसांनी नाशिक आठवले. त्यामुळे ते सुद्धा येऊन झाडांना मिठी मारून गेले. पण मी सांगतो की, मी २० हजार झाडे लावतो आहे", असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

"सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये गुंडगिरी होती. देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं आणि गुंडगिरीचा बीमोड केला. विकास करण्यासाठी सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत असायला पाहिजे. विकासाचे अनेक मुद्दे आपल्याला सांगता येतील. पण विरोधक बोलघेवडे आहेत. त्यांच्या हातामध्ये काहीच नाही. सर्वांना कमळाचे बटण दाबून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करा. आपल्याला नाशिकमध्ये शंभरी पार करायची आहे," असे आवाहन त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Girish Mahajan challenges Thackeray brothers to win municipal elections.

Web Summary : Girish Mahajan criticizes Uddhav and Raj Thackeray, challenging them to win a municipal election. He highlighted development work and countered criticism regarding tree cutting in Nashik, promising extensive tree plantation. He urged voters to support BJP for continued development.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६Raj Thackerayराज ठाकरेGirish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरे