नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प

By Suyog.joshi | Updated: November 22, 2023 10:30 IST2023-11-22T10:28:01+5:302023-11-22T10:30:43+5:30

अचानक बस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले

Nashik Municipal Corporation's City Link bus service stopped again | नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प

नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प

नाशिक: दोन वर्षाचा बोनस मिळत नसल्याने सिटी लिंकच्या 450 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सकाळी पुकारले. अचानक बस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

यापूर्वी तीन महिन्यापासून पगार थकत होता. आता एक महिन्याचे पगार थकला आहे. याशिवाय एसआय व पीफ सात आठ महिन्यांपासून भरलेला नाही तो लगेच भरावा. एसआयचे पैसे भरले नसल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याची कर्मचारी यांची तक्रार आहे. 

मागणी पूर्ण न झाल्याने हे सहावे आंदोलन आहे. विनातिकीट प्रवाशी करून ३६४ रुपये दंड केला जातो, मात्र तो दंड वाहकाला तीन ते पाच हजार केला जातो तो बंद करावा. दोन वर्षांपासून पगार वाढ झालेली नाही. पहाटे चार वाजेपासूनच तपोवन मध्ये असलेल्या बस डेपोतून एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
 

Web Title: Nashik Municipal Corporation's City Link bus service stopped again

टॅग्स :Nashikनाशिक