नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना उलटफेरहोणार, काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवार मिळत नाही हे ज्ञात असले तरी भाजपने तब्बल २२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिला आहे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनसेतून अलीकडेच भाजपत आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेता सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांचा समावेश आहे.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले होते. पंचवटी विभागातून सर्वाधिक आत नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. शिंदेसेना स्थापन झाल्यानंतर तसेच लोकसभा निवडणुकीतील राजकीय वारे बदलल्याने अनेक फेरफार झाले आणि विधानसभा निवडणुकीत यश राज्यात भाजपला आल्यानंतर भाजपत भरती आली होती. त्यानंतर आता उमेदवारी देताना भाजपने आपल्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे.
यात धक्कादायकरीत्या माजी महापौर अशोक मुर्तडक, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, कमलेश बोडके, सतीश सोनवणे, शाहीन मिर्झा, रूची कुंभारकर, शशी जाधव, वर्षा भालेराव, प्रियांका घाटे, अंबादास पगारे, पंडित आवारे, मीरा हांडगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माजी स्वीकृत नगरसेवक श्यामला दीक्षित तसेच प्रशांत जाधव यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. याशिवाय सिडकोतील माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांना उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी त्यांचे पती माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर तसेच सुपुत्र दीपक बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Web Summary : In Nashik, BJP denied tickets to 22 former corporators, including ex-mayor Ashok Murtadak. Many from Panchavati were excluded after political shifts and new entrants joined the party. Some councilors' family members received tickets instead.
Web Summary : नाशिक में, भाजपा ने पूर्व महापौर अशोक मुर्तडक सहित 22 पूर्व पार्षदों को टिकट नहीं दिया। पंचवटी के कई लोगों को राजनीतिक बदलावों और पार्टी में नए प्रवेशकों के बाद बाहर कर दिया गया। कुछ पार्षदों के परिवार के सदस्यों को टिकट मिला।